आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'न्यायालयीन भरती प्रक्रिया रद्द करा'; मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- न्यायालयीन भरती प्रक्रिया त्वरित रद्द करावी, अपात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. 


न्यायालयीन भरती प्रक्रियेसाठी दिलेल्या मूळ जाहिरातीतील निकषानुसार भरती प्रक्रिया राबवावी. एमपीएससीद्वारे सर्व क्षेत्रातील जागेचा अनुशेष तत्काळ भरावा. या परीक्षांचा निकाल महिनाभरात जाहीर करावा. प्रत्येक भरतीमध्ये प्रतीक्षा यादी लावावी. तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे राबवावी. नुकतीच सुरू केलेली इंटर्नल एंट्री पद्धत यूपीएससीमधून रद्द करावी, डी.एड., बी.एड., शिक्षक भरती करावी, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्राध्यापक भरती सुरु करावी, सीएचबी पद्धत बंद करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. 

 

औरंगपुऱ्यातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता मोर्चा निघाला. मिल कॉर्नर, भडकल गेट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकमार्गे मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड, कपिल इंगळे, विक्की बेलखोडे, सिद्धार्थ शिंगारे, धर्मेंद्र मेश्राम आदींची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...