आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दोन दशकांत शहरांच्या तापमानात 5 अंशांपर्यंत वाढ; ‘दिव्य मराठी’ वृत्तांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद, नवी दिल्ली- देशात गेल्या दोन दशकांत कमाल तापमान सतत वाढत आहे. हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, गेल्या १८ वर्षांत कमाल तापमान सामान्य ते पाच-सहा अंश सेल्सियस जास्त नोंदले जात आहे. २००० व २००१ मध्ये तापमान एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर भारतात ३० ते ३२ अंश सेल्सियसच्या जवळ नोंद होते होते. आता ते वाढून ३८ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत झाले आहे. उत्तर भारतात दक्षिण भारताच्या तुलनेत जास्त कमाल तापमानाची नोंद होत आहे. कमाल तापमानातील हा दल आता स्थायी झाला आहे. म्हणजे फक्त एखाद्या वर्षी जास्त उष्णता वाढण्याचा हा मुद्दा नाही. गेल्या १८-२० वर्षांत भारताचे तापमान वाढले आहे. २०१८ मध्ये मार्च ते मे महिन्याचे सरासरी तापमान ३२.२२ अंश सेल्सियस होते. उत्तर भारताच्या अनेक भागांसह मध्य भारताच्या भागातील कमाल तापमान मार्च ते जूनदरम्यान १० वर्षांपूर्वीपर्यंत ३५ ते ३८ अंश सेल्सियसदरम्यान जात होते. पण आता मार्च महिन्यांतही दिल्लीसह राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत नोंदले जात आहे.


स्कायमेटचे ज्येष्ठ हवामान संशोधक महेश पलावत यांनी सांगितले की, दिल्लीसह लखनऊ, अमृतसर आणि उत्तर भारतातील अनेक मोठ्या शहरांत कमाल तापमान एप्रिल ते जून या महिन्यांत सरासरी ३५ अंश सेल्सियस नोंदले जात आहे. २००० च्या आसपास ते ३१ अंश असायचे. दरवर्षी शहरांच्या तापमानात सरासरी ०.२ ते ०.५ अंश सेल्सियसपर्यंत सतत वाढत असल्याचा ट्रेंड दिसत आहे. औद्योगिक प्रदूषण, वायू प्रदूषण, एसीतून निघणारी उष्णता आणि औद्योगिक प्रकल्पातून निघणारा किरणोत्सर्ग यांसारख्या अनेक घटकांमुळे देशातील तापमान ५० ते ६०% पर्यंत वाढत आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील शहरांचे तापमान वाढत आहे. इंडियन असोसिएशन फॉर पोल्युशन कंट्रोलचे सरचिटणीस श्याम गुप्ता यांनी सांगितले की, २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत काँक्रीटच्या जंगलांमुळे किरणोत्सर्ग आणि गॅस निघतो. त्यामुळे कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. मोठ्या शहरांत लहान शहरांच्या तुलनेत तापमान जास्त राहण्याचा ट्रेंड झाला आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळुरू यांसारख्या देशातील ज्या शहरांत विकास होत आहे तेथे तापमानही वाढत आहे. हवामानाच्या परिभाषेत अशा स्थळांना अर्बन हीट आयलँड म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मोठ्या इमारतींत लागलेल्या एसीतून जी उष्णता बाहेर पडते ती तिची नोंद आपोआप हवामान केंद्रातही होते. एवढेच नाही तर विविध राज्यांच्या हवामान अंदाज अहवालानुसार आगामी दोन-तीन दशकांत (२०२१ ते २०१५) देशात शहरांचे कमाल तापमान १ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरासरी पावसावरही परिणाम होईल. राज्यांतर्फे जारी झालेल्या आकड्यांनुसार देशातील प्रत्येक राज्यात आगामी काळात तापमानातील वाढ स्पष्टपणे दिसत आहे.

 

उत्तरेकडील शहरांचे तापमान दक्षिणपेक्षा जास्त 

२०१८ मध्ये एप्रिल ते जूनदरम्यान उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेत तापमान १.५ अंश जास्त राहील. दक्षिणमध्ये फेब्रुवारी-मार्च आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कमाल तापमान नोंदले जाते. उत्तरेत कमाल तापमान मार्च ते ऑक्टोबरमध्ये जास्त नोंदले जाते. हवामान विभागाच्या अंदाज विभागाचे प्रमुख डी. एस. पै यांनी सांगितले की, दक्षिणच्या तुलनेत उत्तरेत तापमान वाढले आहे.

 

उत्तरेत एक अंश जास्त

यंंदा एप्रिल ते जूनमध्ये पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, चंदिगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व-पश्चिम राजस्थानात तापमान सामान्य ते १ अंश जास्त राहील. गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम तसेच पूर्व मध्य प्रदेशातही सरासरी तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.

 

मोठ्या शहरांत जास्त उष्णता

इंडियन असोसिएशन फॉर पोल्युशन कंट्रोलचे सरचिटणीस श्याम गुप्ता यांनी सांगितले की, २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात तापमान वाढीचा ट्रेंड दिसत आहे. मोठ्या महानगरांत आणि ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांत हरिच कवच नष्ट होत आहे. शहरातील काँक्रीटच्या जंगलांमुळे रेडिएशन आणि गॅस निघत आहे. त्यामुळे महानगरांत कमाल तापमान इतर शहरांच्या तुलनेत २ अंश सेल्सियसपर्यंत वाढते. दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळुरूसह देशातील शहरांचे तापमान वाढत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, ३० वर्षांत असे बदलेल हवामान... 

बातम्या आणखी आहेत...