आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी दिला छगन भुजबळांचा बळी- सावंत, पुतण्याला वाचवण्यासाठीची खेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची भाषा करत आहेत. मात्र, २००६ मध्ये कृषिमंत्री असताना या आयोगाची स्थापना करणाऱ्या पवार यांनीच ८ वर्षे या शिफारशी गाडून टाकल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला. सिंचन घोटाळ्यातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाचवण्यासाठी पवार यांनी छगन भुजबळ यांचा बळी दिला. पवारांचा भाजपला आतून पाठिंबा असल्याची टीकाही त्यांनी केली. आप राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

आपच्या संघटनात्मक बांधणीसाठी सावंत यांनी बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शरद पवार यांनी आता हल्लाबोल आणि संविधान बचाव आंदोलन सुरू केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने कायम संविधानविरोधी भूमिका घेतली आहे. आता त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

बातम्या आणखी आहेत...