आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वेरूळ - औरंगाबादहून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो वेरूळ घाटातील कठडा तोडून दरीत कोसळता कोसळता बचावला. या ट्रकचे एका बाजूचे सहा टायर खड्ड्यात तर दुस ऱ्या बाजूचे रस्त्यावर अशी दोलायमान स्थिती निर्माण झाली. हा ट्रक बाजूला काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ट्रक बाजूला काढता काढता तब्बल पाच तास लागले. त्यामुळे घाटात दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली.
बुधवारी पहाटे औरंगाबादहून धुळ्याकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक घाटाचे कठडे तोडून दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन पोहोचला. मात्र थोडक्यात अनर्थ टळल्याने चालक व क्लिनर बचावले. हा अपघात पहाटे घडला तरी एका बाजूने खड्ड्यात रुतलेला हा ट्रक बाजूला काढण्यासाठी ११ वाजता क्रेन बोलावण्यात आली. ट्रक बाजूला काढण्यासाठी क्रेनचालकाला तब्बल ५ तास कसरत करावी लागली. यामुळे दुतर्फा वाहतुकीची कोंड झाली.
सकाळी ११ पासून ते सायंकाळी ४ पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ पाटील यांच्यासह त्यांच्या सहका ऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घाटापासून वेरूळ लेणी जवळच असल्याने वाहतूक कोंडीत थांबण्यापेक्षा अनेक पर्यटकांनी भर उन्हात वेरूळ घाटातून पायपीट करत लेणीला भेट देणे पसंत केले.
दिशादर्शक फलकही नाही
दिशा दर्शक फलक नसल्यामुळे कंटेनर, मोठे ट्रक हे दौलताबादच्या कमानीपर्यंत जाऊन परत येतात. नंतर वेरूळ-कसबखेडा बायपास मार्गे जातात. दौलताबादपर्यंत जाणे व तेथून परत येणे यामुळे ३० किमी चा प्रवास, वेळ, डिझेल वाया जाते. जड वाहतुकीस बंदी असल्याने नो एंट्रीच्या नावाखाली पोलिसांत दंडही भरावा लागतो.
जड वाहतूक बंद.. तरीही
वेरूळ घाटातून जड वाहतूक बेलगाम सुरू आहे. दौलताबाद किल्ल्या शेजारील सातवा दिल्ली दरवाजाला जड वाहने घासून चिरे कोसळत आहेत. जड वाहतूकीमुळे सतत अपघात होत आहेत. मोठ्या वाहतुकीमुळे लेणीसह श्री घृष्णेश्वर मंदिर या पुरातन वास्तूंना धोका उद्भवत आहे. घाटातील वाहतुक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने १५ वर्षांपासून दौलताबाद ते वेरूळ मार्गावरील जड वाहतूक दौलताबाद टी-पॉइंट-कसाबखेडा फाटा-भोसले चौक वेरूळ मार्गे वळवली. तरीही चालक वेळ वाचवण्यासाठी याच घाट मार्गाचा वापर करत आहेत.
वाहतूक कर्मचारी जखमी
पो.हे.कॉ.योगेश नाडे हे वेरूळ लेणी समोरील मुख्य प्रवेश द्वारावर वाहतूक सुरळीत करत असताना एजाज शेख यासीन, रा. कन्नड याने त्यांच्या पायावर गाडी घातल्याने ते जखमी झाले. शिवाय नाडे यांच्याशी अरेरावी केली. खुलताबाद पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. नाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
यांनी केली वाहतूक सुरळीत
घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ पाटील, पो.हे.कॉ.शेख हारून, पो.हे.कॉ. योगेश नाडे यांच्यासह इतर सहका ऱ्यांनी प्रयत्न केले.
पुढील स्लाइडवर पाहा, दरीत कोसळण्याच्या स्थितीत असलेला मालवाहूक ट्रक...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.