आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ट्रक समोरासमोर भिडले, 25 फूट लांब लोखंडी सळया केबिनमधून थेट समोरच्या ट्रकमध्ये घुसल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक वैजापूर, शिऊरमार्गे कसाबखेड्याहून गुजरातकडे निघाला होता. कसाबखेड्याजवळ येताच रविवारी रात्री ११ वाजता समोरून धन्याने भरलेला ट्रक एक गाडीला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दोन चालकांसह क्लीनर गंभीर जखमी झाले. अपघातात सळ्याने भरलेल्या ट्रकचालकाने जेव्हा जोरदार ब्रेक लगावला. तेव्हा ट्रकमधील सळया थेट केबिनमधून समोरच्या ट्रकमध्ये अपघातानंतर घुसल्या. परंतु सुदैवाने यात कुणालाही सळया लागल्या नाहीत. परंतु दोन्ही गाडयांचा समोरासमोर अपघात झाल्यामुळे तिघे गाडीत दबून गेले होते. अपघातानंतर तिघांनी मदतीसाठी आरडाओरड केली. दोन्ही गाड्या क्रेनच्या साहाय्याने वेगळ्या करण्यात आल्या.

 

आपबीती; विजय गेलाबुवा,चालक, रा.पोरबंदर गुजरात
देवगावमार्गे कसाबखेडा फाटा येथून रात्री अकरा वाजता आम्ही वेरूळकडे निघालो, ७ किमी पुढे आल्यावर एका गाडीला ओव्हरटेक करत एक ट्रक समोर दिसला. मी ब्रेक दाबला, परंतु समोरची गाडी वेगात असल्याने आमच्या ट्रकवर धडकली. दरम्यान ब्रेक जोरात लावल्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या २५ फुटांच्या लांब जाड सळ्या आमच्या केबिनमधून निघून समोरच्या ट्रकमध्ये फसल्या. त्यानंतर आम्ही ट्रकमध्ये अडकलो. 

 

जोरात ब्रेक दाबल्याने सळया दुसऱ्या गाडीत घुसल्या
समोरून ट्रक दिसताच सळयांनी भरलेल्या ट्रकच्या चालकाने करकचून ब्रेक दाबला. ब्रेक जोराने दाबल्याने ट्रकमधील सळया थेट केबिनमधून निघून समोरच्या ट्रकमध्ये घुसल्या. यामुळे दोन्ही ट्रक सुमारे तीन तास अडकून पडले होते.

 

क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने केली वेगळी

वैजापूरहून  ट्रक क्र.जीजे २५ टी ७१०३  हा लोखंडी सळ्या भरून  कसाबखेडा वेरूळ महामार्गे गुजरातकडे जात होता. तर दुसरा ट्रक क्र.एपी ०७ टी डब्ल्यू ८५७९   हा धान्याचे पोते भरून वेरूळमार्गे कसाबखेडा मार्गावरून औरंगाबादकडे जात होता. यामध्ये एक ट्रक हा  ओव्हरटेक करताना वेरूळ कसाबखेडा मार्गावर मेवात धाब्याजवळ रात्री ११ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात ट्रक चालक विजय गेलाबुवा वय ३० वर्षे रा. पोरबंदर, गुजरात, दुसरा चालक केनाग बेरानव ४० रा. अमरावती जि. गुंटूर, अांध्र प्रदेश व क्लीनर निबुजी वय ४० रा. विनकोडामंडळ जि. गुंटूर अशी जखमींची नावे आहेत. तिघे ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने व सळयांमुळे गाड्या जाम अडकल्या होत्या. यामुळे मार्गावर सुमारे तीन तास ट्रॅफिक जाम झाली होती. अपघातानंतर पोलिसांसह ग्रामस्थांनी अपघातस्थळी रात्रभर मदतकार्य करत क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने वेगळी केली. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.