आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: गिरणा धरणावर फिरण्यास गेलेल्या मालेगावच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव, नांदगाव- रमजान ईदनंतर परिवारासह गिरणा धरण क्षेत्रात सहलीला गेलेल्या मोहमद सैफअली मोहम्मद संमसुद्दीन (वय २२, रा. फार्मसीनगर) व अब्दुल मलिक इसा (वय २०, रा. कमालपुरा, मालेगाव) या दोघा तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 


सैफ अली व अब्दुल मलिक हे त्यांच्या कटुंबियांसह गिरणा धरणावर गेले होते. परिवारातील सदस्यांना सोडून ते धरण किनाऱ्याने दूरवर गेले. त्यात धरणात बुडत असताना एकाने आवाज दिल्याने हा प्रकार लक्षात आला. मदतीसाठी लोक धावत असतानाच दोघे पाण्यात बुडाले होते. दोघांनीही कपडे काढलेले नव्हते. त्यामुळे ते अांघोळ करत होते किंवा पोहण्यासाठी गेले होते हे निश्चित समजले नाही. त्यामुळे या तरुणांच्या धरणात बुडण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. युवक धरणात बुडालेल्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमनचे जवान धरणाकडे धावले. 


शकील ताहेराक या जवानाने दोघा तरुणांचे मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढले. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...