आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कचराबाद'चे पुन्हा 'औरंगाबाद' करण्यासाठी वेंगुर्ला पॅटर्न, रामदास कोकारे औरंगाबादेत दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 'कचराबाद' अशी ओळख मिळवलेल्या आपल्या शहराला पुन्हा औरंगाबाद बनवण्यासाठी आता वेंगुर्ला पॅटर्न राबवला जाणार आहे. शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेत मुख्याधिकारी आणि वेंगुर्ला पॅटर्न यशस्वीरित्या राबवणारे रामदास कोकारे यांना अतिरक्त प्रभार देण्यात आला आहे. औरंगाबादेत तातडीने काम सुरू करण्यासाठी कोकारे औरंगाबादेत दाखल झाले असून त्यांनी सोमवारी अगदी सकाळपासूनच कामाला सुरुवातही केली आहे. 


वेंगुर्ला शहराला काही वर्षांपूर्वी कचऱ्याच्या समस्येने वेढले होते. पण त्यानंतर त्याठिकाणी रामदास कोकारे हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी शहरातचा कायापालटच करून टाकला. त्यांनी प्रशासन आणि लोकसहभागातून कचरा व्यवस्थापनाचा आदर्श असा वेंगुर्ला पॅटर्न तयार केला. देशभरात या पॅटर्नचे कौतुक झाले. रामदास कोकारे यांनी राबवलेला हा पॅटर्न अनेक शहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात आला. 


औरंगाबादचा अतिरिक्त प्रभार
रामदास कोकारे हे वेंगुर्ला येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त आहेत. औरंगाबादच्या कचरा समस्येवर काहीही तोडगा निघत नसल्याने रामदास कोकारे यांना या प्रश्नात लक्ष घालण्यात सांगण्यात आले. त्यांच्याकडे या कामासाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते तीन दिवस औरंगाबादेत कचराप्रश्न सोजडवण्यासाठी आणि तीन दिवस वेंगुर्ला येथे त्यांची मुख्याधिकारी पदाची जबाबदारी पार पाडतील. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे वेंगुर्ला पॅटर्न.. 

 

बातम्या आणखी आहेत...