आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी, प्राध्यापक, समाजाला अपेक्षित शिक्षण विद्यापीठात मिळावे: डॉ. तेजनकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निष्ठेने काम करणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. त्यामुळे गटा-तटात नव्हे तर सर्वांनी मिळून काम करण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजाला अपेक्षित असे शिक्षण विद्यापीठात मिळावे, असेच कार्य करण्यावर भर राहील, अशी ग्वाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले प्र- कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सोमवारी दिली. कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या हस्ते पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 


प्लेसमेंट सेंटर सुरू करणार 
रोजगाराभिमुख, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना पसंती दिली जात आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यापीठात प्लेसमेंट सेंटर सुरू केले जाईल. या सेंटरचे कामकाज वर्षभर चालेल, त्यातून सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना काम मिळावे, असा प्रयत्न राहील. कँटीन, रीडिंग रूम २४ तास सुरू ठेवण्याचेही प्रयोजन आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी प्रबोधन केंद्रही सुरू केले जाईल, असेही तेजनकर म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...