आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव येथील तरुणाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील रामदास बाळहारी सोनवणे वय (३४) यास पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


खामगाव येथील रामदास बाळहारी सोनवणे बारा वर्षांपासून अयोध्यानगर बजाजनगर येथे राहतो. २५ जून रोजी सकाळी ६ : ४५ वाजता हा आयोद्धा नगर ते माेहटादेवी रस्त्यावर पायी जात असताना एम.एच २० डी.आर. ८२२३ या दुचाकीने पाठीमागून रामदास यास जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता २८ जून रोजी पहाटे ६ : ४५ वाजता रामदासचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई वडील, भाऊ, भावजई आहेत. सदरील दुचाकी चालक संतोष सुभाष काळे रा.बजाजनगर औरंगाबाद यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे व मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...