आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांपूर्वी वडिलांची आत्महत्या, मुलानेही घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्लोव्हरडेल शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रज्वल विजय देसाई (१५, रा. विवेकानंदपुरम, उस्मानपुरा) याने गुरुवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रज्वलची आई शिक्षिका असून त्या शाळेत गेल्या होत्या. घरात वयोवृद्ध आजी होती. दुपारी त्याने गळफास घेतला. घरी आल्यानंतर आईने हा प्रकार पाहून हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी उस्मानपुरा पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तो एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहेत. त्याचे वडील एंड्युरन्स कंपनीकडून आफ्रिकेतील घाना देशात काम करत होते. २००८ मध्ये त्यांनीदेखील आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तपास उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत.