आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदाना येथे मातीनाल्यामध्ये पोहताना युवकाचा बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- ममनापूर शिवारातील पिंपळखोरा येथील मातीनाल्यामध्ये पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.अमोल पंडित चव्हाण (२०, रा. गदाना, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे.
अमोल हा आपल्या तीन मित्रांसोबत गदाना गावापासून एक किमी अंतरावरील नानासाहेब गदानकर यांच्या शेतात असलेल्या मातीनाल्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. तो पाण्यात उतरला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या वेळी सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली.

या वेळी धावून आलेल्या अमोल वाहूळने पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु अयशस्वी ठरला. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या पश्चात एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.