आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामा मावशी घरी आले, सासूने विरोध केला; दरवाजा तोडून घेऊन गेले इंजिनिअर नववधूला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घरच्यांच्या मनाविरुद्ध आणि स्वत:पेक्षा तीन वर्षांनी कमी वयाच्या मुलासोबत आंतरजातीय लग्न करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचे तिच्या माहेरच्यांनी अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आपल्या सुनेचे अपहरण झाल्याची तक्रार तरुणीच्या सासरच्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर मुलीचा मामा, मावशी अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दरम्यान, तरुणीचे नातेवाईक तिचा कसून शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक के. डी. महांडुळे यांनी सांगितले. सोमवारी दुपारी जवाहरनगर ठाण्यासमोर तरुणीच्या सासरच्या मंडळीने गर्दी केली होती. 

अभियांत्रिकीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेली तरुणी स्वत:चा व्यवसाय असलेल्या तरुणाची दोन ते अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु मुलीच्या घरच्यांना दोघांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. २७ एप्रिल रोजी दोघांनी सहमतीने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून विवाह केला. त्यानंतर मुलगी मुलाच्या घरी राहण्यासाठी गेली. परंतु एप्रिल रोजी दुपारी २.३० ते वाजेच्या सुमारास मुलीचे मामा, मावशी इतर चार ते पाच जण तरुणाच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी भावनिक कारण पुढे करून मुलीला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या सासरच्यांनी विरोध केल्याने आरोपींनी घराचा दरवाजा तोडून नववधूला बळजबरी खेचून गाडीत बसवून नेले. हा प्रकार घडताच मुलाच्या आईने जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक के. डी. महांडुळे करत आहेत. याप्रकरणी आरोपींवर मारहाण अपहरण करणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात अाले आहेत. 

कुटुंबसधन, मुलगा, मुलगीही उच्च शिक्षित...
मुलगा-मुलीकडील दोन्ही कुटुंबे सधन सुशिक्षित आहेत. मुलीने अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून मुलाचाही स्वत:चा व्यवसाय आहे. परंतु मुलीच्या कुटंबाला हे नाते मान्य नव्हते. २७ एप्रिलला मुलगा मुलीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात माहिती देऊनच कायदेशीर लग्न केले होते. परंतु तीन दिवसानंतर मुलीच्या नातेवाइकांनी तिच्या सासरच्या घरात घुसून तिचे अपहरण करत सर्व जण पसार झाले. 
बातम्या आणखी आहेत...