आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक गेम दृष्टिदोषावर उपचार; दहा वर्षांच्या प्रयत्नांना आले यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दृष्टिदोष दूर करण्यासाठी कॉम्प्युटर गेम विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे. त्याची ही बोलकी छायाचित्रे.)
औरंगाबाद- कॉम्प्युटरच्या जास्त वापरामुळे नजर कमी होते, लवकर चष्मा लागतो हे सत्य आहे; पण त्याच कॉम्प्युटरचा वापर करून दृष्टिदोष नाहीसा करता येतो, असा शोध शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी लावला आहे. चेन्नई येथे झालेल्या नेत्रतज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेत या संशोधनाला मान्यता मिळाली असून गेल्या वर्षभरात ८२ नेत्ररुग्णांवर देशपांडे यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.
आनुवंशिकतेप्रमाणे रंग, चेहरा, स्वभाव, रोगाप्रमाणे नेत्रदोषही पुढील पिढीत संक्रमित होतो. मात्र, ही गोष्ट पालक किंवा त्या नवजात बालकाला लक्षात येत नाही. कालांतराने जेव्हा हे मूल शाळेत जायला लागते त्या वेळी त्याचा लिहिण्याचा, वाचनाचा वेग कमी असतो. अनेकदा समजून सांगूनही तो साध्या बेरीज-वजाबाकीत चुका करतो. हा दोष अनेकदा त्याच्या आकलनशक्तीचा नसून नेत्रदोषाचा असू शकतो. समोरील वस्तू किंवा आकडे नीट समजल्यामुळे ही अडचण येऊ शकते. झोप येणे, थकवा येणे, डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत.
ज्या लहान मुलांना जन्मापासून नंबर बरीच वर्षे चष्मा लावल्यामुळे डोळे उत्तम असूनही त्यांची वाढ नीट होत नाही त्यांना कोणताही चष्मा लावूनही पूर्ण दृष्टी येऊ शकत नाही. डोळ्यांच्या पडद्याला पूर्ण चालना मिळालेली नसल्याने त्या लहान मुलांची दृष्टी पूर्णपणे येत नाही. अशा डोळ्यांना वैद्यकीय भाषेत (अँवलायोपिया) म्हणजेच आळशी डोळे असे म्हणतात.
अशा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आजपर्यंत फक्त चांगला डोळा बंद करणे (पॅच लावणे) आणि आळशी डोळ्याला काम करायला लावणे एवढाच उपाय जगभर प्रचलित होता. पण वासन आय केअरमधील डॉ. प्रदीप देशपांडे यांच्या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे कॉम्प्युटर गेम्स (चष्म्याच्या नंबरच्या आधारे तयार करण्यात आलेले गेम) दृष्टी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
आळशी डोळ्याला पॅच लावल्यामुळे मुलांच्या मनावर दडपण येते. त्यामुळे अनेकदा ही मुले पॅच लावायला नकार देतात किंवा यासाठी जबरदस्ती केल्यास त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. याशिवाय कधी कधी ज्या डोळ्याला पॅच लावला जातो त्याच डोळ्याची दृष्टीदेखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे मुलांना रोज १५ ते ३० मिनिटे विशिष्ट पद्धतीने गेम खेळू दिल्यास त्यांच्या दृष्टीत आश्चर्यकारक बदल काही दिवसांतच होतो.
शहरातील ८२ मुलांना फायदा
२००५पासून शहरात हा प्रयोग होत आहे. वासन आय केअरमध्ये एक वर्षात ८२ मुलांना याचा फायदा झाला आहे. तीन वर्षांपासून पुढे कोणीही या गेमचा वापर करू शकतो. ते १५ वयोगटातील मुलांना याचा फायदा लवकर होतो. त्यापुढील वयोगटासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.
प्रतिक्रिया
- २००७मध्ये चेन्नई येथे अखिल भारतीय स्ट्रॅबिस्मॉलॉजिकल सोसायटीत या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी मला बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड मिळाला आहे. गेली दहा वर्षे यासाठी अविरत प्रयत्न करून हे उत्कृष्ट तंत्रज्ञान विकसित केले आहे. आज अनेक जण याचा फायदा घेत आहेत.
डॉ. प्रदीप देशपांडे, बाल नेत्रतज्ज्ञ विशेषज्ञ
बातम्या आणखी आहेत...