आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेला दोन कोटींचा गंडा, परस्पर विकली तारण ठेवलेली जमीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हाउसिंग प्रोजेक्टकरिता ६२ गुंठे जमीन बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतलेले असतानाही कर्जाची परतफेड करण्याआधीच ही जमीन एका संस्थेस परस्पर विकून मलकापूर बँकेला दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पवनदीपसिंग कोहली, योगेश शिंदे यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा प्रकरणातील मुख्य आराेपी आमदार रमेश कदम यांच्याच संस्थेस ही जमीन विकण्यात आली.
२०११ मध्ये कोहली याने मुकुंदवाडीतील मलकापूर बँकेकडून हाउसिंग प्रोजेक्टसाठी दोन कोटी रुपये कर्ज घेतले होते. कर्जप्रकरणामध्ये योगेश शिंदे हा जामीनदार आहे. कर्जासाठी कोहलीने बीड बायपास येथील बाळापूर शिवारातील ६२ गुंठे जमीन तारण ठेवली. दरम्यान, २०११ नंतर कोहलीने ८० लाख रुपये कर्जाची परतफेड केली. परंतु बँकेचे उर्वरित एक कोटी वीस लाखांचे कर्ज बाकी असतानाही एप्रिल २०१४ मध्ये ही जमीन आमदार रमेश कदम यांच्या जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहसंस्थेला विकली. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक धर्मेंद्र परमार यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून कोहली, शिंदेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला भंडाफोड
मलकापूरबँकेकडून दोन कोटी रुपयांच्या कर्जासाठी जामीनदार असलेला योगेश शिंदे हासुद्धा जमिनीच्या रजिस्ट्रीमध्येही साक्षीदार होता. कर्ज घेतल्यानंतर ६२ गुंठे जमिनी विकल्याच्या प्रकरणााबद्दल मात्र बँकेला कल्पना नव्हती. त्यामुळे कोहली यांनी ठराविक मुदतीत कर्जफेड केल्याने जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर तारण ठेवलेली जमीनच परस्पर विकली असल्याचा प्रकार उघडकीस आला.