आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या तरूणाईचा इंटरनेटवर बोलबाला, यूट्यूब व्हिडिओला मिळाले 10 लाखांहून अधिक Views

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील काही अवलिया तरूणांनी एकत्र येऊन बनवलेल्या डान्स व्हिडिओला यूट्यूबवर दहा लाखांहून अधिक Views मिळाले आहेत. विशेष म्हणजे पैकी 75 टक्के Views हे देशभरातून तर उर्वरीत 25 टक्के Views विदेशातून मिळाले आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, युएई, आणि नेपाळ या देशांतील युजर्सनी देखील या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. अनिकेत हरेर आणि त्याच्या टीमने हा व्हिडिओ बनवला आहे. शहरातील तरूणांनी आपल्या या कलाकृतीच्या जोरावर देशासह विदेशात स्वता:ची नवी ओळख प्रस्थापित केली आहे.

एमजीएम महाविद्यालयाच्या परिसरात या व्हिडिओचे शुटींग करण्यात आले आहे. उत्कृष्ठ चित्रिकरण आणि उत्तम नृत्य दिग्दर्शनाच्या जोरावर बनवलेला हा डान्स व्हिडिओ सध्या देशासोबतच विदेशातही हिट झाला आहे. युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून आपली कलाकृती कशी जगभर पोहोचवता येऊ शकते, हे या तरूणांनी दाखवून दिले आहे.

आणखी क्रिएटीव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न- अनिकेत हरेर
सहज म्हणून बनवलेल्या या व्हिडिओला एवढी प्रसिद्धी मिळाल्याने अर्थातच खूप आनंद झाला आहे. यात सिनेमॅटोग्राफर हर्षवर्धनचा मोठा वाटा आहे. यापुढेही आम्ही असेच क्रिएटीव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू असे अनिकेत हरेर याने सांगितले आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...