आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Doctor's Gold Chain Stolen From The Valley Hostel

हॉस्टेलमध्ये घुसून डॉक्टरची चेन हिसकावणाऱ्या तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटीतील होस्टेलमधून डॉक्टरची सोन्याची चेन हिसकावून पळ काढणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. जुलै रोजी घाटीच्या होस्टेलमध्ये डॉ. सिद्धार्थ खोब्रागडे आपल्या रूममध्ये झोपलेले असताना पहाटे च्या सुमारास काहींनी त्यांच्या डोक्यात जेवणाचा डबा मारून जखमी केले होते. गळ्यातील सोन्याची चेन आणि सॅमसंग कंपनीचा मोबाइल हिसकावून पळ काढला होता. खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हे शाखेचे कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना मध्यवर्ती बसस्थानकाजवळ शेख चाँद पाशा शेख नईम ( २०, रा. एसटी क्वार्टर्स), शेख लतीफ ऊर्फ कन्नड्या शेख रशीद ( २५ , रा. पोलिस कॉलनीच्या मागे, पिशोर, ता. कन्नड) आणि शेख राजू ऊर्फ इक्बाल शेख अय्युब (२३ , रा. अलाना कंपनीसमोर, चितेगाव रोड) हे तीन आरोपी संशयितरीत्या फिरताना दिसले. विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच डॉक्टरला मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन मोबाइल पळविल्याचे कबूल केले. त्यांना बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना चोवीस तासांत पकडण्याची कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, रमेश कंदे, प्रकाश भालेराव, मनोज चव्हाण, शेख जावेद, संतोष सूर्यवंशी, मंगेश मनोरे, लाड यांनी केली.
नशा करण्यासाठीचे पैसे संपले म्हणून केली चोरी
शेख चाँदपाशा शेख नईम शेख लतीफ ऊर्फ कन्नड्या शेख रशीद हे दोघेही बोक्या टोळीचे आहेत. या दोघांवर चोरी, जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी या टोळीत शेख राजू ऊर्फ इकबाल सामील झाला होता. या त्रिकुटाला नशा करण्याची सवय असल्याने ते डॉक्टरवर हल्ला करण्याच्या दिवशीही नशा करीत होते, परंतु पैसे संपल्याने त्यांनी डॉक्टरांच्या होस्टेलकडे आपला मोर्चा वळवत आपले काम भागवले.