आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मवाली येता-जाता काढायचे छेड, तक्रारीची धमकी देताच घरात घुसले; 17 वर्षीय मुलीने केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काॅलनीतील मुलांकडून सतत विनयभंग होत असल्याने १७ वर्षीय मुलीने कंटाळून विषारी औषधाचे प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिटीचौक भागात घडली. १० जुलै रोजी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी माजेद शेख, मुजीब शेख यांना अटक केली. त्यांचा साथीदार अकबर अतिक पसार झाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
१० जुलै रोजी मुलगी किराणा दुकानावर गेली असता आरोपींनी तिच्याकडे एकटक पाहण्यास सुरुवात केली. याचा राग आल्याने मुलीने असे का पाहता, मी माझ्या आई, वडिलांना सांगून तुमची पाेलिसांत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देऊन घरी गेली. तिच्यापाठोपाठ दोन आरोपी देखील गेले आणि तिच्या घरात घुसून विनयभंग केला. घडलेला प्रकार सहन न झाल्याने मुलीने डास मारण्याचे औषध पिले. थोड्या वेळानंतर हा प्रकार तिच्या कुुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती आता चांगली असून तिच्या जबाबावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला रुग्णालयातून घरी आणल्यानंतरही तपास अधिकारी उपनिरीक्षक अाश्लेषा पाटील यांच्या पथकाने मुलीची घरी जाऊन विचारपूस केली आणि तिला धीर दिला. 
बातम्या आणखी आहेत...