आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यामुळे मुलीचा बळी, मृतदेह ठेवला पंचायत समितीत, पोलिसांची मध्यस्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी असतानाही विहिरीतील पाणी नळयोजनेतून दलितवस्तीत सोडण्यात येत नसल्याने पाणी शेंदतांना विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील चौथी वर्गातील मुलगी राजश्रीचा औरंगाबादेत उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.
ग्रामसेवक ग्रामपंचायत नळाला पाणी सोडत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह गेवराई पंचायत समितीत ठेवुन एकास ठिय्या आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी गुन्हे नोंदवण्याचे आश्वासन देताच नातेवाईकांनी मृतदेह उचलून दुपारी मुलीवर अंत्यसंस्कार केले. मुलीच्या उपचारसाठी जर कुटूंबाला दोन लाख रूपये मिळाले तर कदाचीत मुलीचे प्राण वाचले असते.
कमी पावसामुळे मागील तीन वर्षापासुन तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढावत असुन यंदा ६६ गावांमध्ये पाणी टंचाई आहे. बागपिंपळगावात पाणी टंचाई असुन येथे सार्वजनिक विहिरीतील पाणी नळ योजनेव्दारे गावात सोडण्यात येते. गावातील दलितवस्तीवर नळाचे पाणी साडले जात नसल्याने ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी शेंदून काढावे लागत आहे. गावातील नामदेव कांबळे यांना दीड एकर शेती असून ते मजुरी करून उरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले चार मुली असुन यातील धाकटी मुलगी राजश्री वय- १० हीस घरी पाणी नसल्याने २२ फेब्रुवारी रोजी विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. पाणी शेंदत असतांनाच तीचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली.
तरूणांनी तिला विहीरीतून बाहेर काढले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ग्रामस्थांनी तिला गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांनतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता राजश्रीचा मृत्यू झाला.संतापलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता राजश्रीचा मृतदेह गटविकास अधिकारी बी.डी. चव्हाण यांच्या कार्यालयासमोर ठेवला जोपर्यंत ग्रामसेवक एन.एस. मुसळे ग्रामपंचापयतीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा घेतला. पाणी मिळत नसल्याने विहिरीत पडून मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दुपारी अंत्यसंस्कार
पंचायत समितीत मुलीचा मृतदेह ठेवल्यांनतर मुलीचे नातेवाईक थेट गेवराई पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यांनतर पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम हे पंचायत समितीमध्ये आले ग्रामसेवक मुसळे ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मुलीवर गावात अंत्यसंस्कार केले.

नातेवाईक संतप्त :
जोपर्यंत फुलेपिंपळगाव येथील ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. पंचायत समितीत जवळपास एक तास मुलीचा मृतदेह बीडीओंच्या कार्यालयासमोर ठेवून ठिय्याच मांडला.

पाण्यास टाळाटाळ
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव जायकवाडी वसाहत ही ग्रुप ग्रामपंचायत असून गावची लोकसंख्या १६०० आहे. गावात दोन सरकारी विहिरी असून एका विहिरीचे पाणी दुसऱ्या विहिरीत सोडण्यात येते . त्यांनंतर गावात नळयोजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु गावातील दलित वस्तीत नळ योजना असूनही जाणूनबुजून पाणी पुरवठा करण्यात नव्हता. असे कांबळे कुटुंबाने सांगितले.
घाटसावळीत मुलीचा विहिरीत पडून मृत्यू
गेवराईतालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील विहिरी पाणी आणण्यासाठी गेलेल्या चौथीतील मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच घाटसावळी येथील शेतात विहिरीत पाणी शेंदतांना तोल जाऊन पडलेल्या युवतीचा शनिवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बीड तालुक्यातील घाटसावळी येथील कोमल प्रेमनाथ लांडे वय-१७ ही मुलगी शेतातील विहिरीत दुपारी एक वाजता पाण्यासाठी गेली हाेती. पाणी शेंदतांना विहिरीतील खडकाला कळशी आदळल्याने विहिरीत तोल जाऊन ती पडली. विहिरीजवळ एका महिलेने आरडाआेरड केली परंतु शेतात कोणी नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काेमल लांडे ही मुलगी अकरावीत शिक्षण घेत होती. शेतकरी प्रेमनाथ लांडे हे पोटाच्या आजाराने घरी असतात. त्यांना आजारामुळे शेेतातील काम करता येत नाही. त्यामुळे कोमल ही शेतात जाऊन गुरे सांभाळण्याचे काम करून वडिलांना मदत करत असे. तिच्या पश्चात आई, दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ... तर मृत्यू झाला नसता... असा झाला मृत्यू