आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा घाटात मोठा दगड कोसळला; एका बाजूची वाहतूक ठप्प, जीवितहानी टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा  - गुरुवारी रात्रभर पाऊस पडताच अजिंठा घाटात डोंगरावरून दगड  कोसळले. या वेळी एका बाजूची वाहतूक ठप्प होती. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.  
 
गुरुवारी दिवसभर पावसाचा लपंडाव सुरू होता. त्यावेळी डोंगरावरून पाण्याबरोबर दगडही कोसळत होते. दरम्यान रात्री घाटात मोठा दगड पडल्याने रात्रभर एका बाजूने वाहतूक सुरू होती. ही माहिती मिळताच बीट अंमलदार शोभा वाकीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. एकूण घाटात एकीकडे दरडींचा धोका तर दुसरीकडे कठडे नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका असा दुहेरी धोका वाहनधारक घाटात पत्करत आहेत. डोंगरकडांना संरक्षण जाळी बसवावी अशी मागणी होत आहे.    
 
बांधकाम विभाग झोपेत : पावसाळ्यात दरवर्षी घाटात डोंगरावरून दगड कोसळतात. मात्र तरी बांधकाम विभाग काही दखल घेत नाही. सा.बां. विभाग कार्यालय घाटापासून सात किमी अंतरावर आहे. तरी त्यांनी भेट देऊन पाहणी केली नाही.
बातम्या आणखी आहेत...