आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंबादमधील वाद्यांचा पुजारी, देश-विदेशातील ११८ लक्षवेधी संगीत वाद्यांचा संग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संगीताला आयुष्यात खूप महत्त्व आहे. संगीतामुळे मनोरंजन तर होतेच, शिवाय आयुष्य आंनदीही राहते. संगीतामध्ये वाद्यांना खूप अनन्यसाधारण महत्त्व असते. अशाच वाद्यांचा संग्रह पुंडलिकनगरातील पंडित गोपाल मिश्रा यांनी केला आहे. त्यांच्याकडे देश-विदेशातील ११८ वाद्ये आहेत.

गुरूंकडून शिक्षण
पंडित मिश्रा हे मूळचे ओडिशाचे रहिवासी. जगन्नाथपुरी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री त्यांचा जन्म झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्याने त्यांची बहीण निरुपमादेवी यांनी सांभाळ केला. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी संगीताची साधना करत बासरी वादन करण्यास सुरुवात केली. त्यांनी पंडित रविशंकर यांचे मेहुणे उस्ताद  जौहर खान, गुरुजी हरिहर कुंटिया आतत्राण सत्पथी आणि फ्रान्सचे डेव्हिड या  गुरूंपासून गिटार, सरोद, मेंडोलीन, तबला वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले. सोबतच त्यांनी बासरीपासून ते जलतरंगपर्यंतची विविध प्रकारची वाद्ये वाजवली. तसेच वाद्य संग्रह करण्याचा छंदही लागला. 
 
विविध वाद्यांचा संग्रह 
१९८४ मध्ये मुंबईत आले. येथे संगीतकार आर. डी. बर्मन आणि नौशाद यांच्यासोबत काम केले. परंतु, तेथील वातावरण त्यांना मानवले नाही. ते औरंगाबादेत आले. त्यांनी देश-विदेशातील विविध १४१ वाद्ये वाजवण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. ऑस्ट्रेलियातील हेडिडग्रीडिओ, जर्मन- चार्मस, इटली- पियानो अॅकॉडियल, अरब देशातील उद वाद्य, युगांडामधील जिथर, लंडनचे बाजूल, फ्रान्सचे सॅक्सोफोन, अमेरिका- ट्रंपेट, चीन- हार्मोनिका, बांगलादेशचे दुतारा, े कांगो-बांगो, तुंबा, झेकोल्सोव्हाकियाचे हडीगार्डी, फ्रान्सचे टुबा, बॉसन ही वाद्ये आहेत. तसेच भारतीय वाद्यांमध्ये सितार, सरोद, काश्मीर की संतूर, बासरी, येशरा, तबला, ढोलक, ढाेलकी, हलगी, संभळ, ड्रम अशी अनेक वाद्ये त्यांच्याकडे आहेत.

शिष्यांकडून देणगी न घेता त्यांच्याकडून वाद्य घेतले. ही आगळी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सध्या माळीवाडा येथे जागा घेतली असून त्याठिकाणी संगीत आश्रम सुरू केले जाणार आहे. यात अंध, अपंगांना मोफत संगीतवाद्यांचे शिक्षण देणार आहे.
- पंडित गोपाल मिश्रा, संग्राहक

त्यांच्याकडे १७ हजार विद्यार्थ्यांनी  शिक्षण घेतले आहे. शिष्यांकडून त्यांनी फीस न घेता त्यांच्या देशात असलेले वाद्य देणगी स्वरूपात घेतले. त्यांची सोहरी मिश्रा, साबेरी मिश्रा ही मुलेही संगीत क्षेत्रात आहेत. 
 
हार्माेनिका 
याला संगीत क्षेत्रातही महत्त्व आहे. हार्मोनिका हे आपल्याकडील वीणेच्या आकारासारखे आहे. फ्रान्समध्ये हे वाद्य आहे. ते चीनमध्ये आहे. हार्मोनिका अनेक रंगांत आहे. तसेच विविध स्वर निघतात. पितळ, स्टेनलेस स्टील किंवा कांस्यापासून तयार केलेली असते. जॅझ, रॉक आणि रोलासाठी या वाद्याचा वापर केला जातो. 

कांगो-बांगो
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक प्रचलित असलेले वाद्य म्हणजे कांगो-बांगो. हे वाद्य पंडित मिश्रा यांच्याकडे आहे. साधारणत: वीस वर्षांपूर्वीचे असलेले हे वाद्य त्यांच्या आफ्रिकन शिष्यांनी दिले आहे. आपल्याकडील तबला आणि ढोलकीसारखे हे वाद्य आहे. परंतु, याचा ध्वनी वेगळा असतो. उभे राहून हे वाद्य वाजवले जाते.

मारिंबा
आफ्रिकी देशांमध्ये वाजवले जाणारे हे मारिंबा वाद्य लाकडापासून बनवलेले असते. आदिवासी समाजात वापरले जाणारे हे वाद्य लक्ष वेधून घेते. हे वाद्य तोंडाने किंवा नाकाने वाजवले जाते. अशाप्रकारचे वाद्यसद्धा मिश्रा यांनी संग्रही ठेवलेले आहेत. ते वीस वर्षांपूर्वी आणले आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा  विविध लक्षवेधी संगीत वाद्य...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...