आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या,कोटनांद्रा येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव बाजार- सिल्लोड तालुख्यातील कोटनांद्रा येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव नारायण रामदास शिंगारे असून वय ३२ वर्षे आहे. नारायण यांनी राहत्या घरी मंगळवारी रात्री घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या वर्षी कोटनांद्रा गावात तीन युवकांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी जनजागृती करण्याची वेळ आल्याचे मत माजी सरपंच संजय निकमसह ग्रामस्थांनी व्यक्त केले. आत्महत्या थांबवण्याबाबत जनजागृतीचे कार्यक्रम राबविणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...