आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शाळकरी विद्यार्थ्याची अनाहूत घुसखोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
छाया : रवी खंडाळकर
शहानूरमियाँ दर्गा रोडवरील सहकारनगर चौकात सौर दालनाचे उद््घाटन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळाकडे निघाल्यानंतर एक शाळकरी मुलगा सायकल घेऊन ताफ्यात शिरला. त्याच्यापुढे मुख्यमंत्र्यांची गाडी अवघ्या चौथ्या क्रमांकावर होती. विद्यार्थ्याची ही अनाहूत घुसखोरी पाहून क्षणभर पोलिसही गांगरून गेले होते. 

या विद्यार्थ्याच्या पाठीमागे ताफ्यातील अॅम्ब्युलन्स, एक सुरक्षा वाहन आणि वीस ते पंचवीस गाड्या होत्या. पोलिसांनी त्याला हळूच बाजूला काढले अन् ताफा पुढे निघून गेला. 
बातम्या आणखी आहेत...