आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवाजी महाविद्यालयात आज ‘आई’ महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महिला सबलीकरण कक्षातर्फे शनिवारी (31 ऑगस्ट) आई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिव तथा ज्येष्ठ विचारवंत किरण मोघे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. महिला सबलीकरण या विषयावर मोघे यांचे विशेष व्याख्यान होणार असून विविध क्षेत्रांत काम करणार्‍या महिलांचा सन्मानही करण्यात येणार आहे. या वेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला सबलीकरण कक्षप्रमुख डॉ. प्रतिभा अहिरे, सदस्या डॉ. विद्या कस्तुरे, डॉ. अलका गडकरी, डॉ. मीना वडगुळे, प्रा. सीमा काशीद, प्रा. नाज शेख, प्रा. स्वाती भोसले, प्रा. स्नेहप्रभा शिरढोणकर, प्रा. एस. ई. जैन, प्रा. लता पाखरे,प्रा. योगिता जाधव, प्रा. योगिता शितोळे, प्रा. प्रियंका पवार, प्रा. मोनिका फुलारी, प्रा. सुनीता सोनवणे, प्रा. निर्मला पाटील, प्रा. वर्षा खरे, डॉ. रवींद्र धोती, डॉ. रणजित पवार आदींनी केले आहे.