आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पार्टीत आता फेसबुक विंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने फेसबुक विंगची स्थापना केली आहे. सोशल साइटच्या माध्यमातून अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने तसेच पार्टीच्या ध्येय धोरणांची माहिती तरुण आणि उच्चशिक्षितांपर्यंत पोहोचवण्यासाठी पार्टीने फेसबुक एडिटर या पदाची निर्मिती केली. अशा प्रकारची पदनिर्मिती करणारा हा पहिलाच पक्ष ठरला आहे.

जिल्ह्याच्या कार्यकारिणीत हरमितसिंग संघा यांना फेसबुक एडिटरचे पद देण्यात आले आहे. माध्यमाचे बदलते स्वरूप लक्षात घेत पार्टीने ही विंग तयार केली आहे. तरुणाईला पार्टीकडे आकर्षित करण्यासाठी पक्षाचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. फेसबुक आणि टिव्टरसारख्या सोशल साइटवर प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने अण्णा हजारे यांच्या आंदोलनात युवकांनी हिरिरीने सहभाग घेतला. ही बाब सर्वांना आर्श्चयचकित करणारी ठरली. त्यामुळे ही संधी हेरण्यासाठी पक्षाने स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या तरुण पिढीचा कल ओळखून या माध्यमाचा खुबीने उपयोग करण्यात आला आहे. टिवट्रसाठी app_aurangabad, फेसबुकसाठी aamadmi_aurangabad असा अँड्रेस देण्यात आला आहे.

नेमके काय करणार?

पक्षाचे विविध उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवणार.
दुर्लक्षित विषयांवर प्रकाश टाकणार
सामान्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा सुचवणार
समस्या मांडण्यासाठी सामान्यांना व्यासपीठ देणार

सामान्य जनतेच्या आवाजाचे साधन
राजकारणापासून दूर जाणार्‍या तरुणांना पुन्हा या सामाजिक क्षेत्राकडे वळवण्याकरिता हा प्रयत्न केला जाणार आहे. सोशल नेटवर्किंग साइटकडे एक प्रभावी शस्त्र म्हणून आम्ही पाहतो. सामान्य जनतेचा आवाज म्हणून हे माध्यम काम करेल. या माध्यमातून अनेक बाबी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हरमितसिंग संघा, फेसबुक एडिटर, आम आदमी पार्टी.