आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांतील उपेक्षित ‘आप’मध्ये झाले दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विविध राजकीय पक्षांमध्ये वर्षानुवष्रे काम करूनही मान-सन्मान मिळत नसल्याने निराश झालेले तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडून उपेक्षित राहिलेले अनेक कार्यकर्ते रविवारी आम आदमी पार्टीत दाखल झाले. पार्टीत सामील होताना त्यांनी जुन्या पक्षांतील कारभारावर टीकेची झोड उठवली.

सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून जेथे दलालांना सन्मान दिला जातो, भ्रष्टाचार ज्यांना शिष्टाचार वाटतो अशा पक्षात राहण्यापेक्षा प्रस्थापितांना शह देण्यासाठी एकजुटीने लढणार असल्याचे आश्वासन नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले.

पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर ‘आप’ने दिल्लीचा गड सर केला. आता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने शहरात प्रथमच दोनदिवसीय राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या बैठकीत लोकसभा उमेदवारांची माहिती, जिल्हा कार्यकारिणीची निवड व विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छावा संघटना, शेतकरी संघटना, विविध संस्था, डॉक्टर, वकील, अभियंते, सर्वसामान्य नागरिकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.