आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Demanded Resignations Of BJP's Corrupt Leaders In Aurangabad

घोटाळेबाज मंत्र्यांची सीबीआय चौकशी करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजप सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. मात्र, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करता पक्षातील वरिष्ठ नेते शांत बसले आहेत. त्यामुळे मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी, उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची सीबीआय चौकशी करत राजीनामे घेण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

आपच्या वतीने सोमवारी क्रांती चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघडकीस येत असूनही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील याविषयी बोलण्यास तयार नाहीत. विदेशातील काळा पैसा भारतात आणून १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू, असे आश्वासन देत सत्तेवर आलेले भाजपचे भ्रष्टाचारमुक्त भारत अभियान फक्त देखावा असल्याचा आरोप आपच्या वतीने करण्यात आला. या वेळी मनीषा चौधरी, सुरेश पवार, अस्मा शेख, दत्तू पवार, रेखा महाजन, गौरव भार्गव, वैजनाथ राठोड आदींची उपस्थिती होती.