आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Leader Anjali Damaniya On Ajit Pawar And Gopinath Munde

पवारांचे आत्मक्लेश, मुंडेंचे उपोषण ढोंग; ‘आप’च्या अंजली दमानिया यांचा घणाघाती हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -अभद्र बोलून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी नाष्टा करून एक दिवसाचे आत्मक् लेश केले, तर गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण केले. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांना विमानाने यावे लागले. तो खर्च शेवटी जनतेच्या खिशातून झाला. त्यामुळे या दोघांचे उपोषण निव्वळ ढोंग होते, असा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजक अंजली दमानिया यांनी रविवारी केला.
जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, मयंक गांधी यांनी आठ दिवस उपोषण केले. तेव्हा त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘आप’चा प्रवेश सोहळा रविवारी शहरात पार पडला. या वेळी दमानिया म्हणाल्या, जनलोकपाल 40 वर्षांपासून पडून होते. तेव्हाच ते पास झाले असते तर हे सगळे आज तिहार तुरुंगात असते. पण आठ वेळा संसदेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले विधेयक हेतूपुरस्सर पास केले नाही. याविरोधात लढा देणार्‍या अण्णांना जेलमध्ये टाकले होते. तेव्हा देशातील सामान्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंडे व पवार उपोषण कशासाठी करतात हेच कळत नाही.
मनमोहन, चव्हाण यांची प्रतिमा चांगली; भूमिका मात्र वॉचमनसारखी
पंतप्रधान मनमोहनसिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा चांगली आहे, पण त्यांची भूमिका दारावरील वॉचमनसारखी आहे. आदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांना वाचवण्यासाठी संपूर्ण घोटाळाच फेटाळून लावला. हे कुठेतरी थांबायला हवे. यासाठीच आम्ही राजकारणात उतरल्याचे दमानिया म्हणाल्या.

पतंगराव कदम
मुंडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी पतंगराव कदम विमानाने आले. हा खर्च सामान्यांच्या खिशातूनच झाला. मंत्र्यांना अशी उधळपट्टी करण्याचा अधिकार दिला कुणी?
नारायण राणे
आयकर विभागात शिपायाची नोकरी करणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? त्यांचे सुपुत्र नीलेश राणे दादागिरी करतात हे कुणाच्या आणि कशाच्या आधारावर?
नितीन गडकरी
आप जनतेची दिशाभूल करत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पण ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांची मते जाणून घेण्यात गैर काय?
शीला दीक्षित
दिल्लीतील प्रचारात शीला दीक्षित यांनी केजरीवाल यांच्याबाबत काढलेले उद्गार ऐकले तेव्हापासून त्यांच्याबद्दलची आपुलकी, मान संपुष्टात आला व योग्यता नसल्याचे सिद्ध झाले.