आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Leader Mayank Gandhi Comment On Election System

‘खा मटण अन् दाबा बटण’ घाणेरडी नीती मोडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काँग्रेस 128 वर्षांचा जुना पक्ष आहे. पण दिल्लीच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. काँग्रेसने एवढी वर्षे ‘घ्या पैसे, खा मटण आणि दाबा बटण’ अशा घाणेरड्या नीतीचा अवलंब केला असून, त्यांना उलथवून टाकण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सदस्य मयंक गांधी यांनी केला.
महाराष्ट्रात लोकसभेच्या संपूर्ण (48) जागा लढणार असल्याचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सदस्य मयंक गांधी आणि राज्य संयोजिका अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. 22 डिसेंबरपासून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, पंधरा दिवसांत उमेदवारांची पहिली निवड प्रक्रिया मार्गी लागणार आहे.
देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. पूर्वीची संस्कृती लोप पावली असून घाणेरडी संस्कृती रुजली असून, ती पूर्णत: नष्ट करून आपल्या खर्‍या संस्कृतीचा विस्तार करायचा आहे. त्यासाठीच ‘आप’ राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. आतापर्यंत सत्ताधार्‍यांनी सोयीचे राजकारण केले असून, ते बदलून शुद्ध राजकारणाचे बीज रोवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. संसदेत गेल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत त्यांची खुर्ची निघत नाही तोपर्यंत त्यांचे टाळके ठिकाणावर येणार नाही. काँग्रेस 128 वर्षांचा जुना पक्ष आहे. पण दिल्लीच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. एवढी वर्षे घ्या पैसे, खा मटण आणि दाबा बटण असे चालत आले आहे. यामुळे जनतेची सर्रास लूट सुरू आहे. समस्या कायम आहेत. औरंगाबादेत प्रथमच राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेण्यात आली आहेत.
अशी होणार उमेदवारांची निवड
अर्ज : उमेदवारांना अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये स्वत:ची संपूर्ण माहिती, संपत्ती, शैक्षणिक पातळी, सामाजिक कार्य, गुन्हे आदी.
जनतेचा पसंतीक्रम : जो उमेदवार निवडायचा आहे, त्याला लोक किती पसंत करतात यावर उमेदवारी अवलंबून असेल.
शपथ : उमेदवाराला ‘आप’ ची शपथ घेणे अनिवार्य राहील.
जिल्हा व राज्यपातळी : उमेदवारांची अंतिम निवड पक्षर्शेष्ठी नव्हे, तर जिल्हा व राज्य पातळीवरील समिती करणार आहे.
द्वेषाचे रूपांतर प्रेमात करण्याचा प्रयत्न
गेल्या कित्येक वर्षांपासून देशात द्वेषात्मक राजकारण सुरू आहे. जातपात, धर्म या आधारावर राजकारण केले जात आहे. पैशाचे प्रलोभन दाखवले जात आहे. आम्ही असे करणार नाही.
-मयंक गांधी, सदस्य, आप राष्ट्रीय कार्यकारिणी.