आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षाकडे मुस्लिमांचा ओढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पार्टीने देशभर सदस्य नोंदणी करून पक्षाचे जाळे मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे. औरंगाबादेतही आतापर्यंत झालेल्या आपच्या नोंदणीत 32 टक्के मुस्लिम युवक आहेत. ‘दिव्य मराठी’ने विविध क्षेत्रांतील 350 जणांशी संपर्क साधून केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष समोर आला आहे.
कटकट गेट, किराडपुरा, रोशन गेट, बारी कॉलनी, रहीमनगर, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका परिसर आदी भागांतील युवक, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांची आम आदमी पक्षाबद्दल मते जाणून घेण्यात आली तेव्हा त्यांनी सामाजिक ताणतणावापासून ते महागाईपर्यंतच्या मुद्दय़ासाठी काँग्रेस आणि भाजप जबाबदार असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार, जातिवाद, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यावर आता ‘आप’च्या रूपाने एक चांगला पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुस्लिमबहुल भागात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. निवडणूक आली की हात जोडत मते मागायला येतात. नंतर पाच वर्षे मुस्लिमांच्या प्रश्नांकडे बघायला त्यांना वेळ मिळत नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुस्लिमांच्या विकासासाठी सरकारने अनेक समित्या नियुक्त केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. आम आदमी पक्षाकडून मुस्लिमांचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा वाढत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शेख मुजीब यांनी सांगितले.
‘आप’ने मुस्लिम वस्त्यांमध्ये मागील दोन-तीन महिन्यांपासून सदस्य नोंदणी, नागरिकांच्या भेटी, समस्या जाणून घेण्यात चांगलाच पुढाकार घेतला आहे. नागरिकांना आता दुसरा पर्याय हवा आहे. तो ‘आप’च्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.
व्हॉट्सअँपवर केजरीवालांचे भाष्य
सध्या मोबाइलवरील व्हॉट्सअँपवर अरविंद केजरीवालांचा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर पाहिला जात आहे. नवी दिल्ली येथे मुस्लिमांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले 12 मिनिटांचे भाष्य मुस्लिम युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहे.
अरविंद केजरीवाल यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा व काम करण्याची पद्धत मुस्लिम युवकांना आकर्षित करत आहे. ‘आप’ला चांगली संधी आहे. मोहीब इनामदार, सामाजिक कार्यकर्ते.
काँग्रेसने मुस्लिमांचा फक्त व्होट बँक म्हणून वापर केला. आतंकवादी म्हणून निदरेष तरुणांना अडकवले जात आहे. लोक ‘आप’च्या पाठीशी उभे राहतील. अब्दुल करीम रहेमान, व्यावसायिक.
सरकारी नोकरीत मुस्लिमांचा टक्का अतिशय कमी आहे. हे केवळ काँग्रेस, भाजप सरकारमुळे घडत असल्याची जाणीव होत असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. तबरेज खान, विद्यार्थी.
आम्ही जाती, धर्माच्या आधारावर नोंदणी करत नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार मुस्लिम युवकांचे प्रमाण 35 टक्क्यांपर्यंत आहे. हरमितसिंग, सचिव, ‘आप’ मुस्लिम समाजातील सुमारे 300 व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यांना खालील चार प्रश्न विचारले.
अ) कोणता प्रश्न सर्वाधिक गंभीर ?
ब) हा प्रश्न न सुटण्यास कोण जबाबदार आहे असे वाटते?
क) आगामी निवडणुकीत या प्रश्नावर मतदान होईल असे वाटते का ?
ड) सध्या कोणता पक्ष तुम्हाला न्याय मिळवून देईल असे वाटते?
काय म्हणतात नागरिक