आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Oppose Marath Or Brahaman Reservation, Anjali Damania Said

मराठा असो की ब्राह्मण आरक्षण देण्यास ‘आप’चा कायम विरोध - अंजली दमानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आम आदमी पक्ष आरक्षण मानत नाही. त्यामुळे मराठे अथवा ब्राह्मणांना आरक्षण अशा गोष्टींना ‘आप’चा विरोध आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीतही पुढील काही दिवसांत बैठक घेऊन त्याबाबत धोरण ठरवण्यात येईल, अशी भूमिका ‘आप’च्या महाराष्‍ट्र समन्वयक अंजली दमानिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मांडली.


आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा रविवारी औरंगाबादेतील सिद्धिविनायक लॉन्समध्ये पार पडला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमचा पक्ष आम आदमी आणि भारतीय याच दोन जाती मानत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या तयारीबाबत दमानिया म्हणाल्या की, ‘आप’च्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यामध्ये एका लोकसभा मतदारसंघात ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांची यादी पक्षातर्फे घोषित केली जाणार आहे. त्यानंतर ज्या नावांना ज्यांचे आक्षेप आहेत तसेच ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, ते हरकत घेऊ शकतात. त्यानंतरच उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


वारशाने आरक्षण नको!
आरक्षणाच्या मुद्द्यावर दमानिया म्हणाल्या की, ‘छावा’चे काही लोक पक्षात सहभागी होण्यासाठी आले असता
आम्ही त्यांना आमची भूमिका सांगितली. मराठा आरक्षणाबाबत ‘आप’ची भूमिका काय, याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, आमचा पक्ष कुठलेही आरक्षण मानत नाही. यापूर्वी लोकांना मिळालेल्या आरक्षणाचा एखाद्याने फायदा घेतला आणि तो मोठा झाला, तर त्याच्या मुलाला आरक्षण पुन्हा नको. त्यामुळे किती वेळ आरक्षण द्यायचे याबाबतची पक्षाची भूमिका लवकरच ठरविण्यात येणार आहे.


20 मार्चला जाहीरनामा, 15 लाख सदस्य नोंदणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या आम आदमी पक्षाकडे 68 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी दोन ते पाच उमेदवारांच्या नावांबाबत सोमवारी घोषणा केली जाणार आहे, तर उर्वरित यादी दुस-या टप्प्यात आणि शेवटची यादी तिस-या टप्प्यात घोषित केली जाईल. सध्या राज्यात सहा लाख सदस्यांची नोंदणी झाली असून 15 लाख सदस्य नोंदणीचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. 20 मार्च रोजी ‘आप’चा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे, असे दमानिया यांनी सांगितले.