आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ने झाडला फटाक्यांचा कचरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा शनिवारी दिल्लीत शपथविधी झाला आणि शहरातील कार्यकर्त्यांनी चौकाचौकांत अन् गल्लीबोळात मिठाई वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे फटाक्यांचा कचरा कार्यकर्त्यांनी झाडूने स्वच्छ केला.

पैठण गेट येथे ‘आम आदमी जिंदाबाद’, ‘केजरीवाल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ आशा घोषणा देण्यात आल्या. दिल्लीत जनतेचा विजय झाला. त्याचा आनंद येथील जनता घेत असून महाराष्ट्रात परिवर्तनासाठी सर्वजण सज्ज झाल्याचे पार्टीचे सचिव हरमितसिंग यांनी सांगितले. लोकांना परिवर्तन हवे आहे. ‘आप’ला महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असल्याचे बाळासाहेब सराटे म्हणाले. तर समृद्ध, सुखी जीवन जागण्यासाठी घराणेशाही मोडीत काढून सत्तेचे विकेंद्रीकरण होणे नितांत गरजेचे आहे. त्यादृष्टीने ‘आप’ यशस्वी वाटचाल करत असल्याचे विजय तापडिया यांनी सांगितले. या वेळी किरण पाटील, अँड. लक्ष्मण प्रधान, प्रा. परशुराम वाखुरे, जयाजी सूर्यवंशी, राजकुमार दिवेकर, दत्ता खामगावकर, दत्तू पवार, सय्यद अमजद, संजय नागरे, बळीराम गायकवाड, पाशा खान, रवी चौधरी, ज्ञानेश्वर प्रधान, विष्णू गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.