आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ४८८ पंचायतींत आपले सरकार सेवा केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत यापूर्वी संग्राम प्रकल्प सुरू होता. ही सेवा बंद करून आपले सरकार केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने ११ ऑगस्ट रोजी घेतला. त्या अंतर्गत जिल्ह्यात ४८८ केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. यासाठी झेडपीचे प्रशासन कामाला लागले असून ग्रामपंचायतीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी दिली. १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींत आपले सरकार केंद्र तातडीने कार्यान्वित करावे, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींनी स्वेच्छेने कमी उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीत क्लस्टरप्रमाणे केंद्र सुरू करण्याचे शासन निर्णय गत महिन्यात जारी झाले आहेत. याबाबत सोळुंके म्हणाले, १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या १४३, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ४५ आणि त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ६७६ अशा एकूण ८६१ ग्रामपंचायती जिल्ह्यात असून त्यापैकी ४८८ ग्रामपंचायतींत प्रथम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा अहवाल मंजुरीसाठी पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रात सेवांचा लाभ
ग्रामपंचायतीतीलआपले सरकार केंद्रातून ते ३३ नमुने संगणकीकृत (ऑनलाइन) मिळतील, ११ अाज्ञावली अपडेट केल्या असून १९ प्रकारची प्रमाणपत्रे मिळतील. बँकिंग सुविधा, पासपोर्ट अर्ज, रिचार्ज, रेल्वे, विमान तिकीट बुकिंग, वीज बिल भरणे आदी सेवा उपलब्ध होतील. या केंद्रामुळे कामाच्या स्वरूपानुसार एक किंवा दोन बेरोजगारांना कामही मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...