आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap's Next Target Is Aurangabad Municipal Corporation

आप’चे लक्ष्य औरंगाबाद मनपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिल्लीविधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयामुळे औरंगाबादेतील ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांनी औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचे ठरवले आहे. येत्या २०, २१ फेब्रुवारीला मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यात औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या निवडणुका लढविण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतानुसार हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होणार आहे. उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. औरंगाबादेत भ्रष्ट शिवसेना-भाजप युतीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी लोकांपुढे ‘आप’च्या रूपाने नवा पर्याय उभा राहिला आहे. औरंगाबादेतील लोकांकडून आताच पाठिंब्याचा सूर व्यक्त होत असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.