आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णपुरा यात्रेतून पळवलेला चिमुकला सापडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कर्णपुरा यात्रेत साहित्य खरेदी करताना कडेवरून पळवलेला साडेसहा महिन्याचा चिमुकला रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सर्मथनगरातील प्लॉट क्र. 78 मध्ये राहणारे विजय पालीपोटकर यांच्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये सापडला.

शुक्रवारी रात्री आठ वाजता विठ्ठल रामहरी गायकवाड पत्नी व मुलाला घेऊन कर्णपुरा यात्रेत गेले. पत्नी साहित्य खरेदी करताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गायकवाड यांच्या कडेवरील साहिलला हिसका देत पळवले. गायकवाड व पोलिसांनी त्या व्यक्तीचा माग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु फायदा झाला नाही. साहिलला रविवारी सकाळी त्या अज्ञात व्यक्तीने पालीपोटकर यांच्या बंगल्याच्या आवारात आणून सोडले. मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडत असताना त्यांना लहान मूल रडण्याचा आवाज आला. त्यांनी क्रांती चौक पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर क्रांती चौक आणि छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. छावणी पोलिसांकडे साहिलचा फोटो होता. त्याला पाहताच छावणी पोलिसांचा जीव भांड्यात पडला. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी तत्काळ याबाबतची माहिती गायकवाड यांना दिली. आनंदाची बातमी ऐकून गायकवाडही धावतच ठाण्यात आले. साहिलला पाहून गायकवाड दांपत्याच्या अश्रूंचा बांध फुटला.