आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन सेना आमदार काँग्रेसच्या गळाला, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदार काँग्रेसच्या गळाला लागल्याचा दावा जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केला. लवकरच दोघांचीही नावे जाहीर करू, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली. जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. त्यातून सेनेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकू पाहणारे ते दोन आमदार कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 
 
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाद झाल्याने ते शिवसेना सोडणार, अशी चर्चा होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वादानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यामुळे ते सेना सोडण्याची शक्यता कमी आहे. जाधव यांच्यानंतर संजय शिरसाट आणि पैठणचे संदीपान भुमरे हे दोन आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यताही कमीच आहे. एखादा आमदार शिवसेना सोडणारच असेल तर भाजप हा सक्षम पर्याय असताना काँग्रेसमध्ये का जाईल, असा प्रश्न आहे. दरम्यान, कोणीही पक्ष सोडणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले. 
 
‘संशयकल्लोळ’च 
सत्तार यांच्या दाव्यामुळे आगामी काळात शिवसेनेत संशयकल्लोळ माजण्याची शक्यता आहे. सेना सोडू पाहणारे आमदार कोण, याची चर्चा तर होईलच, दुसरीकडे तिघाही आमदारांकडे संशयाने बघितले जाईल.
 
बातम्या आणखी आहेत...