आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तार प्रदेशाध्यक्षाच्या स्पर्धेत, काँग्रेसच्या १५ आमदारांनी केली पक्षश्रेष्ठींकडे आग्रही मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेस पक्षांत मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार हे नक्की झाले आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नाव घेतले जात असतानाच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तारही शर्यतीत उतरले आहेत.

चव्हाण यांना डावलण्यात आले तर हे पद सत्तार यांच्याकडे जावे, अशी मराठवाड्यातील काही आमदारांची इच्छा असून त्याला चव्हाणांचाही पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
मराठवाडा तसेच खान्देशातून १५ नवनिर्वाचित आमदारही सत्तार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. विदर्भाकडे मुख्यमंत्रिपद आहे. म्हणून तेथेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देणे योग्य नाही, असे सांगत या आमदारांनी सत्तार यांची बाजू घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.

थांबा, वाट पहा
आमदारांनी माझ्या नावाची शिफारस केली, परंतु निर्णय दिल्लीत होतो. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. जेव्हा निर्णय जाहीर होईल तेव्हा सर्वांना कळेलच. - आमदार अब्दुल सत्तार.