आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • About 600 000 People Die Every Year Due To The Consequences Of Hepatitis B.

जागतिक कावीळ दिन विशेष: कावीळ ‘ब’मुळे दर मिनिटाला एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगभरात दरवर्षी 15 लाख लोकांचा म्हणजेच दर मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू केवळ कावीळ ‘ब’मुळे होतो. भारतामध्ये शंभरातील सहा ते आठ व्यक्ती ‘ब’ने, तर एक ते दोन व्यक्ती ‘क’ने बाधित असल्या तरी यातील अनेकांना वर्षानुवर्षे ही धोकादायक कावीळ असल्याचे लक्षातच येत नाही. मात्र, कालांतराने यातील 30 टक्के लोकांना ‘लिव्हर सिरॉसिस’ होण्याची शक्यता असते, तर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता इतर सामान्य व्यक्तींपेक्षा 100 पट जास्त असते. काविळीचे ‘ब’ व ‘क’ हे दोन्ही प्रकार ‘अ’, ‘ड’, ‘ई’पेक्षा अधिक धोकादायक असले तरी योग्य काळजी आणि लसीकरणाद्वारे दोन्ही प्रकारांना दूर ठेवणे शक्य आहे. त्यामुळेच प्रत्येक भारतीय नागरिकाने काविळीची तपासणी करून घेणे, कावीळ नसलेल्यांनी ‘ब’ची लस घेणे आणि ‘ब’ किंवा ‘क’ची बाधा असणार्‍यांनी सवरेपचार घेणे हाच कावीळमुक्तीचा मंत्र वेगवेगळ्या वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.

28 जुलै हा ‘वर्ल्ड हिपॅटायटिस डे’ जगभरामध्ये साजरा होतो. ब्लुम बर्ग या शास्त्रज्ञाने 1967 मध्ये कावीळ ‘ब’चा शोध लावला. त्यामुळे या शास्त्रज्ञाचा वाढदिवस हा ‘वर्ल्ड हिपॅटायटिस डे’ म्हणून जगभरात दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी या दिनानिमित्त ‘कावीळ जाणून घ्या आणि सामना करा’ असा संदेश देण्यात आला आहे. काविळीमुळे होणारी जीवितहानी तसेच गुंतागुंत ही तीव्र गंभीर स्वरूपाची असल्यामुळेच ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ पचनसंस्था विकारतज्ज्ञ, यकृत विकारतज्ज्ञ व एन्डोस्कोपिक अतिविशेषतज्ज्ञ डॉ. रमेश सातारकर, नागपूरचे बालरोग यकृत विकारतज्ज्ञ व पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. योगेश वाईकर, औरंगाबादचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे व औरंगाबादचे प्रसिद्ध वैद्य संतोष नेवपूरकर यांच्याकडून माहिती घेण्यात आली.