आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.तर नगराध्यक्ष कारागृहात जातील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

..सिल्लोड -पालिकेत मागील वीस वर्षांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केल्यास जळगावप्रमाणे येथील नगराध्यक्ष कारागृहात जातील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व सामाजिक न्यायमंत्री संजय सावकारे यांनी सिल्लोड येथे केले.
सिल्लोड नगरपालिका निवडणूक लढवणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा सरचिटणीस दादाराव वानखेडे, सिल्लोड विधानसभा मतदारसंघ समिती अध्यक्ष ठगन भागवत, तालुकाध्यक्ष विष्णू जांभूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराचा विकास कसा करावा लागतो हे पाहण्यासाठी भुसावळ नगरपालिकेने केलेली विकास कामे पाहा, असे सावकारे म्हणाले. सिल्लोड येथील भ्रष्ट कारभारामुळे शहराचा विकास झाला नाही. याला सर्वस्वी आमदार अब्दुल सत्तार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या हातात द्या, असे आवाहन शेवटी राज्यमंत्री सावकारे यांनी केले. या वेळी शहराध्यक्ष बनेखाँ पठाण यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दशरथ सुरडकर यांनी केले. आभार शेख अक्रम यांनी मानले.