आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • About Twenty Percent Of The Maratha Reservation Is Not Aware Of Society ' Chandrakant Bharata

वीस टक्के मराठा समाज आरक्षणाविषयी अनभिज्ञ’ - प्रा. चंद्रकांत भराट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठा आरक्षण कृती समितीचे सरचिटणीस तथा छावा मराठा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट यांनी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंतीपासून सिंदखेडराजा येथून ‘अर्धवस्त्र मराठा आरक्षण पदयात्रा’ सुरू केली आहे. सहा दिवसांत त्यांनी 35 गावांना भेटी दिल्या. त्यामध्ये वीस टक्के मराठा समाजातील नागरिकांना आरक्षणाविषयी माहितीच नसल्याची माहिती भराट यांनी दिली. शुक्रवारी (17 जानेवारी) त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र दर्जा देऊन आरक्षण द्यावे, यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटना तीव्र आंदोलन करत आहेत; परंतु शासन चालढकलपणा करत आहे. वीस वर्षांत पाच आयोग नेमले. आता त्यांनी दिलेल्या वेळेत अहवाल सादर करून मराठा आरक्षण जाहीर करावे. यामध्ये दगाफटका होऊ नये, झाल्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी अर्धवस्त्र पदयात्रेतून जनजागृती करत असल्याचे प्रा. भराट यांनी सांगितले. 20 टक्के लोकांना आरक्षण काय हेच माहिती नसल्याने जनजागृती गावपातळीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या पदयात्रेचा समारोप 19 फेब्रुवारीला शिवनेरी गडावर होणार आहे.

या वेळी भास्कर गाडेकर, निवृत्ती मांडकीकर, अरुण गव्हाड, बालू पठाडे, अंकुश दहीहंडे, अनिल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, गणेश चव्हाण, गंगाधर नगरकर, सुरेश जाधव, प्रमोद बोरसे, दिलीप तौर, निवृत्ती डक, मनोहर निकम, रवींद्र बोडखे उपस्थित होते.