आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्द ग्रामपंचायतीची, वसुली मनपा-समांतरची...वर खोटारडेपणामुळे जनता झाली ‘पाणी पाणी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा पैसे घेते, पण गुंठेवारी म्हणून पाइपलाइन न टाकता समांतरकडे बोट दाखवते. समांतरही पैशांची वसुली करते अन् पाइप टाकल्याचे खोटेच सांगते. अखेर लोक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देतात. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण मनपाला लेखी सूचना देतात; पण काही केल्या ना जलवाहिनी आली, ना पाणी मिळाले. आणखी खोलात गेले असता पैसे भरणाऱ्या कॉलनीने ज्या वेळी गुंठेवारीचे पैसे भरले तेव्हा ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. कामच होणार नव्हते तर मग मनपा अन् समांतरने पैसे घेतलेच का, हा खरा प्रश्न आहे. यंत्रणाच सामान्यांना लुबाडत असल्याचे स्पष्ट होते. शहरातील अबरार कॉलनीवासीयांबाबत हा भयंकर प्रकार घडला आहे.
बीड बायपास रस्त्यालगत असणाऱ्या अबरार कॉलनीतील लोकांनी पाण्यासाठी जलवाहिनी टाकली जावी, अशी मागणी मनपाकडे केली. मनपाने गुंठेवारीच्या नावावर येथील तब्बल शंभर कुटंुबांकडून लाख ३९ हजार ३१३ रुपये गुंठेवारीच्या नावावर शुल्क भरून घेतले. पण जलवाहिनी काही टाकली नाही. त्यानंतर समांतरनेही अभय योजनेच्या नावाखाली या नागरिकांकडून पुन्हा लाख रुपये भरून घेतले. मात्र, मनपाने कधी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर, तर कधी वाढीव पाणीपुरवठा झाल्यावर जलवाहिनी टाकण्यात येईल म्हणत टोलवाटोलवी केली. दुसरीकडे आमच्या करारनाम्यातील नकाशानुसार या ठिकाणी आम्ही जलवाहिनी टाकू शकत नाही, असे समांतर म्हणते. या दोन विभागांच्या टोलवाटोलवीत कॉलनीवासीय मात्र त्रस्त झाले आहेत. त्यांना २०० ते ५०० फुटांवरून नळ घेऊन पाणी घ्यावे लागत असल्याने पुरेसे पाणीच मिळत नाही.

निवडणूक बहिष्काराचे अस्र
अखेर त्रस्त नागरिकांनी २४ मार्च २०१४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी तातडीने उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यामार्फत मनपा आयुक्तांना जलवाहिनी टाकण्याबाबत कार्यवाही करण्याचे पत्राद्वारे कळवले. मनपाने निवडणूक झाल्यानंतर तातडीने जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन देत नागरिकांची बोळवण केली.

काम केले पण अर्धवट
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांनी आमदार सुभाष झांबड यांच्या स्थानिक विकास निधीतून लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. त्यानुसार सिल्कमिल कॉलनी येथील सफा मस्जीद ते महेमूद पटेल यांच्या घरापर्यत १५० मिमी व्यासाची डीआयके जलवाहिनी टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, अबरार कॉलनीपासून ही जलवाहिनी खूप दूर अंतरावर आहे. त्यामुळे तिचा फायदा झालाच नाही. या अर्धवट कामामुळे नागरिकांना जलवाहिनीला बोअर मारून दूरवरून पाण्याचे पाइप जोडत पाणी उपसावे लागत आहे.

अधिकार नसताना जलवाहिनीचे आमिष दाखवले. आधी मनपाने साडेआठ लाखांचा गुंठेवारी कर वसूल केला. नंतर समांतरने अभय योजनेच्या नावाखाली लाख रुपये वसूल केले. प्रत्यक्षात जलवाहिनी टाकलीच नाही. एवढेच नव्हे, तर वर समांतरने ती टाकल्याचे सांगत खोटारडेपणाही केला. शेखरियाज, तबरेज अहमद, शौकत अली, शेख महेमूद (अबरार कॉलनीतील रहिवासी)

अंदाजपत्रक नावालाच
यानंतर अबरार कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक शेख मुनिरोद्दीन यांनी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसह पाहणी केली अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित जलवाहिनी टाकण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंत्यांना तत्काळ जलवाहिनीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. यानंतर उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जलवाहिनीसाठी गुंठेवारी कक्षात पैसे भरणाऱ्या नागरिकांची यादी मिळवली. त्यात पैसे भरल्याचे उघड झाले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने वाॅर्ड क्रमांक ९६ सिल्क मिल कॉलनी येथील सफा मशीद ते अबरार कॉलनीपर्यंत १५० मिमी व्यासाची डीआयके जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सन २००९ ते १० च्या दरसूचीनुसार लाख ४७ हजार ६१० रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले; पण प्रत्यक्षात जलवाहिनी मात्र टाकलीच नाही.

टोलवाटोलवीची कमाल
त्रस्त नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. या प्रत्येक विभागामार्फत मनपा आयुक्तांना कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या. पण सहा वर्षे उलटल्यानंतरही जलवाहनी आली नाही. पुन्हा नागरिकांनी सहा महिन्यांपूर्वी शहर अभियंत्यांची भेट घेतली तेव्हा शहराची पाणीपुरवठा योजना समांतरकडे हस्तांतरित झाली आहे. तुम्ही समांतरकडेही पैसे भरलेले आहेत. त्यांना जाब विचारा असे म्हणत शहर अभियंत्यांनी समांतरकडे बोट दाखवले. त्यानंतर नागरिकांनी माहितीच्या अधिकारात मनपाकडून माहिती मागवली असता आपला परिसर आधी सातारा ग्रामपंचायतीत असल्याचे नंतर १२ ऑगस्ट २०१५ रोजी मनपात समाविष्ट झाल्याचे कळाले. दुसरीकडे अबरार कॉलनीत ३० मार्च २०१६ रोजी २४२ मीटरचे १०० एमएम डीआय पाइप हमीद कॉलनी ते अबरार कॉलनीत टाकण्यात आल्याचे समांतरने मनपाला दिलेले पत्र मिळाले. हे पाहून मनपाने आपली घोर फसवूणक केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
बातम्या आणखी आहेत...