आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मलिक अंबर उड्डाणपुलावरून तरुणाला फेकणाऱ्या फरार आरोपीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टाऊनहॉल येथील मलिक अंबर उड्डाणपुलावरून तरुणाला फेकणाऱ्या फरार आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी रविवारी हर्सूल तलावाजवळील परिसरातून अटक केली. लतीफ अब्दुल लतीफ अब्दुल गफार (२८, रा. हुसेन कॉलनी) असे त्याचे नाव आहे. 

१० फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास मित्राला मदत करण्यासाठी गेलेल्या शेख कलीमला मारहाण करत आठ ते दहा लोकांनी उड्डाणपुलावरून फेकून दिले होते. यातील चार आरोपींना बेगमपुरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सलीम शेख यांनी अटक केली होती. 

या ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांनीदेखील कारवाई करत दोन दिवसांपूर्वी यातील फरार आरोपी गुड्डू याला अटक केली. अन्य एक फरार आरोपी लतीफ हा हर्सूल तलावाजवळ असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, राहुल रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...