आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमांनी एकत्र येऊन राजकीय शक्ती उभी करावी : अबू आझमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुस्लिमांनी त्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय शक्ती उभी करावी, असे आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार व कौमी मजलिसे शूराचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात शनिवारी औरंगाबाद कौमी मजलिसे शूराच्या वतीने आयोजित ‘हालाते हाजरा-मुसलमान कया करे’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई कौमी मजलिसे शुराचे समन्वयक मेराज सिद्दिकी, सलमान फार्सी (मालेगाव), अवेस अहेमद, झियाओद्दीन सिद्दिकी, डॉ. शेख सलीम, कर्नल नेहरी, जावेद कुरैशी आदींची प्रमुख उपस्थिती होते. आझमी म्हणाले की, मुस्लिम मतदार मोठय़ा संख्येने असूनही महाराष्ट्रात एकही मुस्लिम खासदार नाही. मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधी मिळत नाही.यापुढील काळात मुस्लिमांनी एकत्रित येऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून नासेर नाहदी चाऊस, अय्युब खान, अब्दुल रऊफ आदींनी पर्शिम घेतले.