आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे रुपये घेताना लाइनमनला पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विजेचे मीटर दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हर्सूल शाखेच्या लाइनमनला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जाधववाडीतील उपकेंद्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. रामराव आसाराम शेजवळ (५७) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या भावाने नवीन मोंढा येथे एक दुकान भाडेतत्त्वावर घेतले हाेते. त्या दुकानात नवीन मीटर बसवण्यात आले होते. मात्र, मीटर नादुरुस्त होते. ते सुरू करण्यासाठी लाइनमन शेजवळ यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जुलै रोजी तक्रार करण्यात आली. ऑगस्ट रोजी सापळा रचून लाइनमन शेजवळ यांना दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. कारवाईत पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, पोलिस निरीक्षक एस. एस. शेगोकार, के. के. शिदे यांनी ही कारवाई केली. कारवाईत प्रकाश साळवे, कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, गणेश पंडुरे,अजय आवले, सुनील बेलकर, चालक संदीप चिंचोले यांचा समावेश होता.