आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accepted Rain In Aurangabad. 58 Mm Water In Four Hours

औरंगाबादला धो-धो डाला! घरांत पाणी; चार तासांत ५८ मिमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निसर्गाच्या तीन तऱ्हा औरंगाबादकरांनी गुरुवारी अनुभवल्या. दिवसभर उन्हाने काहिली झाली. सायंकाळी नभ भरून आले. गारव्यात रात्री साडेआठपर्यंत केवळ एक मिमी पाऊस पडला. त्यानंतर मुसळधार पावसाने शहराची अक्षरश: दाणादाण उडवली. रस्ते जलमय झाले, शेकडो नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. प्रतापनगर पुलावरील पाण्याने धोक्याची पातळी गाठली हाेती.

येथे घरांत शिरले पाणी
बालाजीनगर, आदर्शनगर, चिकलठाणा कामगार कॉलनी, मुकुंदवाडी राजनगर, विष्णूनगर, जटवाडा, हर्सूल, देवळाई, गारखेडा चौक, उस्मानपुरा परिसर.

शहरात विक्रमी
58.2 मिमी- गुरुवारी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत
205 मिमी- ६ जूनपासून १८ जूनपर्यंत
57 मिमी- गतवर्षी ९ जूनला एकाच दिवसात
181.82% जास्त पाऊस अपेक्षित पावसाच्या तुलनेत अाैरंगाबाद जिल्ह्यामध्ये