आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकलस्वार कामगाराला चिरडून टेम्पोचालक फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - मोटारसायकल स्वारांना हेल्मेटची सक्ती असूनही काही जण केवळ हेल्मेट घातल्यामुळे अपघातात ठार झाले आहेत. पण आता सायकलचालकांनाही टेम्पोच्या सुसाट वेगामुळे बळी जावे लागले. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजता घडली.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी सोमनाथ काशीनाथ कुंभार (३५, रा. ढोरेगाव, कुकाणा, ता. नेवासा, जि.अहमदनगर) वाळूज औद्योगिक परिसरातील बी-२४ सेक्टरमधील औरंगाबाद ऑटो इलेक्ट्रिकल कंपनीत कामाला जात होते. दरम्यान भरधाव टेम्पोने त्यांना धडक देताच टेम्पोच्या ते टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडले आणि जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पोसह घटनास्थळावरून फरार झाला. काही सुज्ञ नागरिकांनी टेम्पो (एमएच २० सीटी ११४१) क्रमांक टिपला आणि पोलिसांना दिला. फरार चालकाला लवकरच ताब्यात घेणार असल्याचा पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले.

मूळ ढोरेगाव येथील सोमनाथ हल्ली परिवारासह रांजणगाव शेणपुंजी येथे राहत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी रांजणगाव फाटामार्गे ते सायकलवरून निघाले. दरम्यान, एफडीसी कॉर्नर येथे भरधाव टेम्पो त्यांच्यासाठी क्रूरकाळ म्हणून आला आणि त्यांना चिरडून निघून गेला. घटना घडताच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. काहींनी तातडीने पोलिसांना कळवले, पण नेहमीप्रमाणे पोलिस कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचले असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगतिले.

यासंदर्भात वाळूज एमआयडीसी पोलिसांत टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत. लोकांकडून मिळालेल्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी फरार टेम्पोचालकाचा शोध सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...