ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अजिंठा घाटातील वळण रस्त्यावर अपघात; वाहनांच्या आठ कि.मी.पर्यंत लांबलचक रांगा
फर्दापूर - राजस्थानमधून औरंगाबादकडे पीओपी पावडर घेऊन जाणा-या ट्रक ( आर.जे. ०७. ३७९७) समोरून येणा-या ट्रक (एच.आर. ७३.०८९३) मध्ये शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजिंठा घाटात वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घाटात तब्बल एक तास वाहतूक खोळंबली. वाहनांच्या आठ कि.मी.पर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनेक चालकांनी औरंगाबादला जाण्यासाठी सोयगाव मार्गे हळदा घाट चढून ४० कि.मी अंतर पार करून जाणे पसंत केले.