आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident In Auranagabd Father And Son Dead On The Spot

औरंगाबादमध्ये अपघातात पिता-पुत्राचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - दुचाकीवरून औरंगाबादमार्गे करोडीकडे (तालुका गंगापूर) जाणाऱ्या कुटुंबीयांना झालेल्या अपघातात पिता-पुत्र ठार, तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. जखमी महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील खवड्या डोंगरालगत हा अपघात झाला. काकासाहेब बाबूराव पवार (४०, रा. मुर्शिदाबाद, ता. फुलंब्री, ह. मु. करोडी) हे त्यांचा मुलगा सचिन (३), मुलगी सपना (६) व पत्नी छाया पवार (३०) यांच्यासह दुचाकीवरून (एमएच २० सीएन ८९३०) करोडीकडे जात होते. त्याच वेळी समोरील ट्रॅक्टरला (एमएच २० सीआर ४४८) त्यांची दुचाकी धडकली. त्यात काकासाहेब यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सचिन व त्याच्या आईला करोडी गावचे रहिवासी राजू गोलार यांनी त्यांच्या कारमधून घाटी रुग्णालयात दाखल केले.
सपना या अपघातातून सुखरूप बचावली. मात्र, उपचारादरम्यान सचिन मृत्युमुखी पडला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.