आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, आरोपीची जामीनावर सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
औरंगाबाद - येथील सिडको भागात राहाणाऱ्या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. श्रुती कुलकर्णी असे या तरूणीचं नाव आहे. श्रुतीनं दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

श्रुतीला स्वप्नील मनियार हा तरूण त्रास देत होता. त्याच्या जाचाला कंटाळून श्रुतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती, मात्र त्याच्यावर फक्त विनयभंगाची तक्रार दाखल केली असल्यामुळे तो जामीनावर सुटला. श्रुतीच्या कुटुंबियांनी स्वप्नीलला त्वरीत अटक करुन कारवाईची मागणी केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, विवेकानंद कॉलेजसमोर अपघात, चालक जागीच ठार