आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाची हूल, युवतीला वाचवताना बिल्डर ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रांतीचौक पोलिस ठाण्याकडून समर्थनगरच्या सावरकर चौकाकडे वळणाऱ्या रिक्षाने कारला हूल दिली. त्या पाठोपाठ आलेल्या पादचारी युवतीला वाचवण्याच्या प्रयत्नात बांधकाम व्यावसायिक अनुजकुमार बंब (४८, रा. वेदांतनगर) कार अपघातात ठार झाले. गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता विवेकानंद महाविद्यालयासमोरील बंडू वैद्य चौकाजवळ हा अपघात झाला. या घटनेत मोनिका निकाळजे (२०, रा. कोटला कॉलनी) ही युवती जखमी झाली. मात्र, तिच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगतले.

गुरुवारी सकाळी अनुजकुमार त्यांच्या स्कोडा कारमधून विवेकानंद महाविद्यालयासमोरील रस्त्याने समर्थनगरकडे निघाले होते. मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना देऊळ बंद चित्रपट दाखवण्यासाठी त्यांना जायचे होते.

"देऊळ बंद'ला उशीर झाल्याने यू टर्न...
अनुजलायन्स क्लब ऑफ रॉयलचे सचिव होते. क्लबकडून गुरुवारी सकाळी वाजता मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना "देऊळ बंद' चित्रपट दाखवण्यात येणार होता. क्लबने अंबा चित्रपटगृहात बुकिंग केले होते. अनुज यांनाही थिएटरवर पोहोचायचे होते. मात्र, जिममुळे त्यांना शोला येण्यास उशीर झाला. अनुज अर्ध्या रस्त्यात असताना चित्रपट सुरू झाल्याचे पारस ओस्तवाल यांनी सकाळी ९.२८ मिनिटाला फोनवर सांगितले. त्यामुळे त्यांनी सावरकर चौकातून यू टर्न घेत कार वळवली असावी, असे सांगण्यात येते.

सगळे धावून आले, पण..
हीघटना घडताच पोलिस कॉलनीतील तरुणांनी जखमी मोनिकाला नजीकच्या आधार रुग्णालयात दाखल केले. काही जण बंब यांच्या मदतीला धावले. या वेळी राज्य शासनाच्या गृह विभागाचे पथक पोलिस वसाहतीच्या पाहणीसाठी आले होते. या पथकासोबत असलेले राखीव पोलिस निरीक्षक विल्सन शिरील यांनी बंब यांना ताबडतोब घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.