आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरबॅग उघडूनही मृत्यू, औरंगाबादेत स्कोडा व वेर्नाच्या धडकेत महिला ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धूत हॉस्पिटलजवळील चौकात झालेल्या अपघातात कारचा असा चुराडा झाला. - Divya Marathi
धूत हॉस्पिटलजवळील चौकात झालेल्या अपघातात कारचा असा चुराडा झाला.
औरंगाबाद - भरधाव ह्युंदाई वेर्ना आणि स्कोडा कारच्या भीषण धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. धूत हॉस्पिटलजवळील चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यात स्वप्निल यांच्याखेरीज पाच जण जखमी असून, धूत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जालन्याकडून वेर्ना गाडीने (एमएच २०-सीएस १४४१) सीमेन्स कंपनीतील अभियंता स्वप्निल जाधव (३०, एन-१, सिडको) घरी परतत होते. त्याच वेळी धूत रुग्णालयासमोरील रस्त्याने भरधाव स्कोडा (एमएच २०-डीजी ७०) त्यांच्या कारला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की वेर्नाचा समोरील बाजूने चुराडा झाला. यात स्वप्निल यांच्या पत्नी सई जाधव (२९) यांचा जागीच मृत्यू झाला. स्कोडामधील कुणाल बाकलीवाल, आशिष राणी आणि अन्य तीन जण जखमी झाले.
एअरबॅग उघडूनही मृत्यू : धडक बसताच वेर्नाच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या. परंतु तरीही सई यांचा मृत्यू झाला. स्वप्निल जखमी झाले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अपघातानंतर कारचा चुराडा....
बातम्या आणखी आहेत...